गो गो गोवा..

First blog



          मनोगत -


first blogpost in marathi maharastrian blog marathi stories lifesyle culture poems

सह्याद्रीच्या पर्वतरांगात वसलेला कोल्हापूर जिल्हा आणि निर्झरांना कुशीत घेऊन बसलेला छोटेखानी मलकापूर म्हणजे निसर्गाचं अद्भुत लेणंच ! वळणावळणाचा कोकणी आंबा घाट आणि देशावरच्या गावांना जोडणारा पहारेकरी म्हणजे मलकापूर. अप्पासाहेब पंतप्रतिनिधींचं हे संस्थान अगदी सुसंस्कारित गाव. अशा गावात माझा जन्म झाला आणि याच गावाने मला उडण्याचं बळ दिलं. अनेक ज्ञात-अज्ञात लोकांनी आमच्या कठीण काळात धीराचे शब्द दिले आणि स्वाभिमानानं जगायला शिकवलं. 
आज चाळीस वर्ष झाली गाव सोडून, पण ‘करोना’ च्या कृपेने जी विश्रांती मिळाली त्यात मागे वळून पाहताना पहिली आठवण आली ती माझ्या गावाची आणि नकळत हातातून शब्द झरू लागले. लेखनाची सुरुवात जन्मभूमीपासून व्हावी हेच विधीलिखित असावे. 
आता काही दिवस माझ्या डोळ्यांना दिसलेलं जग मी उलगडणार आहे. या साऱ्या आठवणी, अनुभव व व्यक्ती असं त्रयस्थ नजरेनी पाहायला खरंतर खूप मजा वाटते आहे. अनेक विषय असले तरी फक्त आनंद आणि आनंदच वाटायचा आहे. या घडीला आवश्यक आणि अनमोल असलेली सकारात्मकता लिखाणातून सगळ्यांना देता यावी हाच एक या ब्लॉग चा उद्देश.  - विजयश्री

टिप्पण्या

  1. ताई, मलकापूर चे वर्णन नक्कीच वाचायला आवडेल. सुदर आठवणी जागवून हा वेळ सार्थ करणं ,ऊत्तमच.......

    उत्तर द्याहटवा
  2. खूप छान लिखाण जयू! तुझी प्रतिभा अशी च बहरु दे
    मंजू

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

Comment box -