- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
आई-
एक गृहीत धरलेलं गृहितक; जी महाकष्टानी एका जीवाला जन्म देते तो तिचा पुनर्जन्मच.. आणि तीच त्या जीवाचं जगातलं एकमेव सुखस्थान! बालपणी तिच्या अमृतधारांनी पोसलेला प्रत्येक पिंड आणि तिच्याच वाणीने,अंगाईने जोजवत गेलेले ते सोनेरी दिवस! हातांचा झुला करून आपल्याला वाढवणारी एक वत्सल मूर्ती म्हणजे आई. वाढत्या वयात तिच्याशिवाय न हलणारे आपले पान आणि आपल्या बालपणीच्या चिमणकथा ऐकायला आतुर असलेले तिचे कान! घराबाहेर घडलेली प्रत्येक गंमत, शाळेत झालेली छडीची शिक्षा आणि बाहेर कुणाशीही भांडण झालं की भोकाड पसरून हक्काने आपली कैफियत ऐकणारी व्यक्ती म्हणजे माता.
बालपण झरझर सरत जाते. नकळत पाऊल तारुण्याच्या उंबरठ्यावर पडते तेंव्हा येणारी नैसर्गिक बेफिकिरी आणि त्यामुळे मित्र-मैत्रिणींच्यावर तिचे असणारे बारीक लक्ष हळूहळू खटकायला लागते. इतके दिवस तिच्याच पदराआड लपणारे आपण खुशाल तिच्यावर ओरडायला शिकतो. तिच्या नजरेची अडचण वाटू लागते. या बेधुंद वळणावर आपण तिचा हात सोडून देतो आणि आपल्यावर नजर ठेवायचा तिचा हक्कं ही हळूहळू कमी होतो.
पुढचं वळण तर यापेक्षाही झोकदार - आपण पायावर उभे राहतो. मग मनाच्या लहरीप्रमाणे वागायला अजूनच मुखत्यार! तिचे काटकसरीचे तत्वज्ञान आपल्याला दरिद्री वाटायला लागते. तिच्या उपदेशाला आपण ‘कंजूषपणा’ ठरवून हवी तशी मनमानी करायला शिकतो. आपल्याला खरंतर तिनेच ‘पायावर’ उभे केले आहे हे आपण सोयीस्कररीत्या विसरून तिला गृहीत धरायला सुरु करतो.
खळखळत्या तारुण्यात आपल्या जीवनात जोडीदाराचा प्रवेश होतो आणि आपण बेधुंद मनाच्या लहरींवर स्वार होतो - सगळं जग विसरतो. आईचं प्रेम आणि possesiveness म्हणजे वेडेपणा वाटायला लागतो आणि आपण तिच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करायला शिकतो.
पुढच्या वळणावर आपण माता-पिता होतो आणि त्रयस्थासारखा विचार केला तर दुनिया गोल आहे हे समजायला लागते. मुलं ‘तुमच्या कथा सांगून बोअर करू नका’ असं बिनधास्त सांगायला लागलेली असतात. आपल्याला ही पिढी वाया चाललीये असं वाटायला लागतं. हे सगळं बघून आपली आई मात्र चेहेऱ्यावर एक स्मितहास्य घेऊन अलिप्त बसून राहते.
काही दिवसांनी जाणवतं, आपला आरडा-ओरडा शांतपणे ऐकायला जगात आता ती नाही….. आक्रंदणारं मन मोकळ करायला, सर्व अपराध पोटात घालून प्रेमानं पाठीवरून हात फिरवायला कुणीही नाही…. मन सैरभैर होतं…. नकळत तिचा फोटो पुसला जातो, उदबत्तीच्या सुवासात एक हार घातला जातो…. ती किंचित हसते आहे असं वाटायला लागतं, उगीचच. दोन्ही डोळ्यातून अश्रू टपकतात..
एवढ्यात स्वयंपाकघरातून धडाधड भांडी पडल्याचा आवाज येतो, आपलीच मुलं उद्या ‘mother’s day’ आहे म्हणून ‘surprise chocolate cake’ च्या नावाखाली स्वयंपाकघर उध्वस्त करत असतात. ‘उद्या सगळं आम्ही करतो’ ‘तू फक्त enjoy कर’ असे आदेश येतात. आपण मागच्या वर्षीपर्यंत त्यांना ‘हे आपलं culture नाही’ हे पटवून देण्याचे आटोकाट प्रयत्न केलेले असले तरी आता सगळा उत्साह बघून खरंच एन्जॉय करुया असं ठरवतो. नंतर ‘दिवस घालून’ आपल्या आईला खरंच सद्गती मिळाली का हे तसंही एक कोडंच असतं. त्यामुळे नवीन पिढीचा YOLO (you only live once) की काय म्हणतात तो दृष्टिकोन बरा वाटायला लागतो. पुढचा दिवस खरंच छान जातो. मस्त जेवण, सिनेमा, विश्रांती, फुगे, फुलांचे डेकोरेशन, गिफ्ट्स, घरी केलेले ग्रीटिंग-कार्ड्स, यु-ट्युब च्या सौजन्याने बनलेला केक आणि दिवसभर चाललेली मुलांची लगबग, सगळंच सुखावून जातं…. त्यांच्या पिढीला कितीही नावं ठेवली असली तरी आपल्या पिढीचं भवितव्य छानच आहे हे जाणवतं. रात्री तो चॉकोलेट केक खात आणि उद्या स्वयंपाकघराचा पसारा कुठून आवरायला सुरु करायचा याची मनात उजळणी करत आपण पुढच्या ‘mother’s day’ ची वाट पाहायला लागतो.
स्थान:
Kolhapur, Maharashtra, India
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या


अहो काय सुंदर लिहिलंय. त्यातून नवी पिढी आणि आपली पिढी याना एक सूत्रात जोडण्याचा प्रयत्न तर अप्रतिम.. शुभेच्छा..
उत्तर द्याहटवाDhanyawaad Mr. Upadhye!
हटवाछान लिहिलंय.. सुंदरच..मिलिंद कुलकर्णी
उत्तर द्याहटवाThank you!!
हटवालेख चांगला आहे.
उत्तर द्याहटवाDhanyawaad!
हटवाछान..
उत्तर द्याहटवाDhanyawaad!
हटवामस्त,दोन पिढीतील अंतर मांडले आहे
उत्तर द्याहटवाDhanyawaad!
हटवामस्त,लेखणीची ताकद आहे
उत्तर द्याहटवाAnek abhaar!
हटवामस्त, शब्दांची निवड अचूक आणि कोणताही फापट पसारा नाही.
उत्तर द्याहटवाThank you!! Such a motivating comment!
हटवाjgd. आई ही सर्व मांगल्याचे माहेर!निराकार परमात्म्याचा जीवासाठी घेतलेला सगुण साकार अवतार! वात्सल्यमूर्ती! माणसाच्या बदलत्या वयाबरोबर त्याच्या भूमिका बदलल्या तरी आई
उत्तर द्याहटवाअसते प्रेमसिंधू! मूलाच्या नव्या भूमिकेने तिच्या वाट्याला येतो दुरावा श विरह!तरीही आई बदलत नाही.तिचे हे भावमयी रुप तू दाखवलयस. शब्दात बांधता येत नाही तिची आभाळमाया! आई गेली की माणूस होतो पोरका!हरवतॅ सुरक्षाचक्र! मायावादी आदि
शंकराचार्याना वाटत "कुपुत्रो जायते क्वचित ,कुमाता न भवती" श्रुतीनीही "मातृदेवोभव" म्हणून आईला अग्रपूजेचा सन्मान दिला आहे. काळाबरोबर mothers'day आला व स्त्री माॅडर्न झाली तरी तिच्या आतली आई चिरंजीवी आहे,हे ही सांगितवं आहेस. ही मात दिनांची शब्दांजली
भावफुलांनी सजलेली व सुगंधित
आहे!अभिनंदन व धन्यवाद!तुझ्यातल्या मातृृत्वाला व विश्वात्मक मातृृृृृत्वाला नमोनमः
Kiti sundar varnan ahe sir! Kharatar tumhi blog suru karayla harakat nahi.
हटवाabhipraayabaddal anek dhanyawaad!
व्वा..
उत्तर द्याहटवालेखन मनाला भावले..
Dhanyawaad!
हटवाखूप छान
उत्तर द्याहटवाThank you Milind! Asech vachun reviews kalawat raha!
हटवाThank you!
उत्तर द्याहटवाखूपच छान शब्दांकन
उत्तर द्याहटवाDhanyawaad!
हटवाKhup khup chhan,Aibaddalche varnan atisundar ani don pidhitil antar mahatvache lekhan.Ek divas tumchya lekhnichi takad lekhikasarkhi hovo hich shubhechha.
उत्तर द्याहटवाThank you so much J.P.Sangrulkar.
हटवाMother is always gr8
उत्तर द्याहटवाSwati
Nakkich!!
हटवा