गो गो गोवा..

स्माईल प्लिज !

 

Photography is the art, application and practice of creating durable images by recording light, either electronically by means of an image sensor, or chemically by means of a light-sensitive material such as photographic film.

लग्नानंतर सगळेच जातात तसे म्हैसूर-बेंगलोर-उटीच्या सफरीवर गेलो. चार फोटो हिरवळीत लोळून काढले की  चंद्र मधू झाला असे लोकांना वाटते ना!😉 स्वतःचा कॅमेरा घेण्याची ऐपत नसल्याने मित्राचा कॅमेरा उधारीवर घेतला होता. त्यात एक रोल टाकला, दुसरा जादा मात्र डबीत अगदी जिवापलीकडे जपत बरोबर नेला. मग काय विचारता? आयुष्यात प्रथमच आपल्या मनाने आणि वेगवेगळ्या अँगलने आपल्या साजऱ्या मुखाचे हौशी फोटो काढायची संधी लाभली. अगदी इथे फोटो काढलाच पाहिजे असे दोघांचे एकमत झाल्यावरच फोटो काढून पुरवून पुरवून रोल वापरला. उगीच वेगळे मत मांडून पक्ष फुटू नये अशी काळजी घेत म्हैसूरमध्ये पहिला रोल संपला. आपल्याला काही कळत नाही हे मान्य करून गुपचूप तो रोल बदलायला एका स्टुडिओत गेलो. पाहतो तर काय, तिथे एका नवदांपत्याचे रणकंदन माजलेले. त्या नववधूने फोटो कसे आलेत बघायला घाईने कॅमेऱ्याचे बटण दाबून बरक्या फणसाच्या गऱ्यातून बी बाहेर काढतो तसा आख्खा रोल बाहेर काढला!😅 बघतात तर काय, सगळे फोटो गायब! त्यामुळे नवरा जाम भडकला  अख्खा रोल वाया गेला होता. स्टुडिओतला बिचारा पोरगा त्यांची समजूत काढत बसला होता, परत काढा साहेब करत विनवत होता. अशातच आमची जोडी तिथे टपकलेली. त्या नवपतीचा जमदग्नी आवतार पाहून रडकुंडीला आलेल्या, भांबावलेल्या नववधूला मी चार धीराचे शब्द ऐकवले. कोपलेले जमदग्नी आणि ती बिचारी नववधू, नापास झालेल्या मुलासारखे तोंड करून निघून गेले. आता आमच्या फोटो कौशल्याचा निक्काल लावायला तो अंधारलेल्या खोलीत गेला. धडधडत्या काळजाने आम्ही बाहेर थांबलो. निकाल आला.. रोल स्वत: बदलायचा नाही  हा शहाणपणा ठरला. सातएक हललेले मानवी अमानवी असे  अगम्य फोटो आणि पाचएक मुंडी छाटलेले, डोळे पांढरे झालेले/मिटलेले वेंधळे फोटो वगळता सगळे फोटो अगदी छान हातात आले होते. शून्यावर दांडी उडाली नाही याचा जगजेत्या सिकंदरा इतका आनंद झाला ! 🤣 प्रथमग्रासे वीसएक फोटो म्हणजे आमच्या तंत्रकौशल्याची कमालच झाली हो! काल तो महापराक्रमी अल्बम बघताना बालपणा पासूनचा फोटोंचा सारा पौराणिक प्रवास डोळ्यासमोर उभा राहिला. 


आमच्या मलकापूरमध्ये एकमेव फोटोग्राफर म्हणजे ‘विक्रम’ फोटो स्टुडिओचे मालक आकाराम पवार. सगळ्या गावभर जाऊन फोटो काढणारे हे एक छोटेसे सदोदित हसणारे सगळीकडे चपळाईने तुरुतुरु पळणारे साधेभोळे लोभस व्यक्तिमत्व. सगळं गाव त्यांना 'विक्रम' असेच म्हणत असे. आमचे दहावीत बोर्डाला लागतात म्हणून ‘आयडेंटी’ (अस्सल  फोटोग्राफर याला आयडेंटिटी असे मुळीच म्हणत नाही😀) फोटो काढले होते. सकाळी तोंड न धुता काढलेले फोटोच भारी दिसतात असा अजब शोध विक्रमकाकानी लावलेला होता. त्यामुळं चेहराच चमकू लागतो आणि फोटो भारी येतो सांगितल्यावर आम्ही वेड्या आज्ञाधारक मुलींनी तसे केलेही !🤣 


The result with photographic emulsion is an invisible latent image, which is later chemically "developed" into a visible image, either negative or positive depending on the purpose of the photographic material and the method of processing.
This is obviously my picture, clicked by Vikramkaka. 

माझ्या लहानपणी या प्रेमळ विक्रमकाकानीच बाळे स्टुडिओत नेऊन फोटो काढायची ‘फॅशन’ आणली असावी. त्यामुळे बाळाच्या डोळ्यात बुट्टीभर काजळ आणि कपाळ, गाल, हनुवटी, तळ-पाय अशा ठिक-ठिकाणी तीट लावून माता बाळराजाना सजवून स्टुडिओत फ़ोटोला नेत  असत. तीट लावली की मूल दृष्टावत नाहीत असा एक समज सगळ्या मातांनी करून घेतला होता. कदाचित त्या काळी मलकापूरची सगळीच बालके कृष्णासारखी सुंदर असावीत! 😋 मग विक्रमकाकांनी त्या अर्धे मुखकमल काजळ-काळे केलेल्या मुलांचे उत्तमच फोटो काढले पाहिजेत असाही एक स्त्रीहट्ट असे. स्टुडिओत मागे एक भुरकट-काळपट असा कोणत्याच रंगांच्या परिभाषेत न बसणारा अगम्य रंगाचा  मोठ्ठा  पडदा कायमचा सोडलेला  होता. त्या फोटोजेनिक देखण्या बाळांना घोडा, चंद्र इत्यादी वर बसवून फोटो काढले जायचे. समोरून फक्त एक प्रकाशाचा झोत, बाकी सगळा बुडुक्क अंधार असे. त्या गूढ अंधारातून माऊलीचा ओळखीचा आवाज तेवढा येई. तीन पायाच्या लोखंडी स्टैंड वरच्या कॅमेऱ्यावर काळे कापड टाकून, स्वत:च्या डोक्यावर तोच काळा बुरखा ओढून उभे असलेले विक्रमकाका असे अंधूकसे दृष्य दिसताच ते मूल टाहो फोडायचं.😆 स्टुडिओतले बाकीचे लाईट घालवून अंधार करताच आकांत करून ते मूल गडाबडा लोळू लागे. मग काय, विक्रम काका, त्याची माता, इतर मदतनीस  त्या बाळाला उचलून शांत करत, गोळ्या-चॉकोलेट देणे, गुदगुल्या करत हसवणे अशा नानाविध उपायांनी त्याचे रडणे थांबवत. मग त्या मुलाची आई त्याला परत पावडर वगैरे लावून ‘प्रेझेंटेबल' करे.👶 ही फोटो चढाई विविध मार्गे दुपारभर अथक सुरु राही. शेवटी बाळ दमून गाई-गाई करे किंवा विक्रमकाका लै दमून आता उद्या या असे सांगून माय-लेकराना माघारी धाडत. वाढदिवस, संक्रांत अशा ‘स्पेशल’ दिवशी घरात असतील नसतील तेवढे दागिने पोराच्या अंगावर चढवून रडक्या भांबावलेल्या पोराला हसवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक माता काकांना ‘फोटो झाक आला पाहिजे’ अशी प्रेमळ धमकी देत असत. दागिने बिचाऱ्या बाळांना टोचायचे, पण मातेच्या हौसेला मोल नाही. मग खूप झटून विक्रमकाका त्या महारडक्या बबड्याचा/बबडीचा छान हसरा फोटो कसा काढत हे एक गूढच आहे. पिप्पाण्या, खुळखुळे वाजवायला स्वयंसेवक तयार असायचे त्यामुळे हे रुसलेले रडके  मुख्य पात्र मधेच एखादा सेकंद हसे आणि काका तो नेमका क्षण टिपत.📸 खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर तो फोटो हातात पडे. फोटोप्रत घ्यायला आलेल्या काही माता देखण्या बाळाची सुंदर छबी पाहून अगदी खुश होत असत तर  काही 'आमचं बाळ इतकं देखणं असताना  फोटो एवढा काय भारी आला नाई हो'sss..अशी मुक्ताफळे उधळून क्षणार्धात काकांच्या कष्टावर पाणी फिरवत. काकांना त्या गोंडस  बाळानी काय दिव्यातून जायला  लावलं  हे साऱ्या गावाला माहिती असायचं. आईच्या नजरेत तिचं बाळ जगातलं सर्वांगसुंदर बाळ असते पण बिचाऱ्या काकानी आडात नसलेले पोहऱ्यात कसे बरे आणावे?😅

A standard black and white couple picture.
A standard black and white couple picture.

काही हौशी लोक आदर्श फॅमिली फोटो काढू लागले. घरदार सुवासिक तेल चोपडून, भांग पाडून, पावडर फासून, नवे कपडे घालून लग्नाला चालल्यासारखे दिसले की सगळ्या गावाला यांचा फोटूचा प्लॅन कळे.👨‍👩‍👧‍👧 लगेच शेजारीणबाई आपल्या प्रेमळ नवऱ्याला ‘आपला फैमिली  फोटो काढू’ म्हणून डिवचू  लागत. त्या काळी नवरा-बायको हौसेने आपले जोडीचे सभ्य फोटो काढून घेत. एका टिपॉयवर जाळीदार टेबलक्लॉथ त्यावर फुलदाणी ठेवलेली शेजारी खुर्चीवर धर्मपत्नीला विराजमान करून पतीदेव जन्मठेपेच्या कैद्यासारखा चेहेरा करून, कमालीचे कारुण्य डोळ्यात आणून शेजारी उभे ठाकून सभ्य संसारी पतीरुपातला फोटो काढून घेत. (सासऱ्याला आदर्श जावई वाटावा म्हणून की काय नकळे!) काही अस्सल खानदानी जरबेचे कुटुंबवत्सल पती जुलुमाने फोटोग्राफर म्हणतो म्हणून नाईलाजास्तव बायकोच्या खांद्यावर  हात ठेवत असत, तर त्या बिच्चाऱ्या अर्धांगीने चेहेरा हसरा ठेवावा ना?... पण छे!! तिचे मुखकमल नेमके भेदरलेल्या सशा सारखे भासे!!! असे वेचक आदर्श फोटो मग विक्रमकाका मोठया शोकेसमध्ये लावून प्रदर्शन भरवत लोकांना पहायला ठेवत. ते फोटो बघून आमच्यासारख्या आचरट मुली खदाखदा हसल्याचेही स्मरते.🤣 आजही काळी चंद्रकळा नेसलेली, हनुवटीला हात लावून खुर्चीत बसलेली गृहलक्ष्मी आणि  धोतर, टोपी/ पगडी, उपरणे  घालून रुबाब डोळ्यात आणताना उग्र दिसणारी मिशाळ भावमुद्रा घेऊन उभे असलेले ‘ते’ असे कृष्ण-धवल  फोटो भिंतींची शोभा वाढवतात. काही पुरुष लग्नातला एकमेव सूट घालून टेचात उभे राहिलेले दिसतात! हेच पुरातन फोटो आपला खरा सांस्कृतिक ठेवा आहेत, कारण कुठेही गळेपडूपणा नाही. सामाजिक अंतर नीटच राखलेले असते. ‘स्माईल प्लिज’ किंवा ‘से चीज’ हे सगळे डायलॉग म्हणून त्या पतिदेवांना हसवण्याची किमया सहज साध्य नाही. असले पुळचट शब्द त्या तेज:पुंज, घरंदाज, सुसंस्कारी, कुटूंबवत्सल, करारी पुरुष जमातीस लागू होत नसावेत.👨 त्या काळच्या मृगनयनी ललनांचे मात्र सुहास्य वदनी सुंदर क्षण टिपण्याचे भाग्य काही भाग्यवान फोटोग्राफरना लाभल्याचे काही पुरावे आहेत.🏄‍👩



त्या काळी लग्नासाठी मुलीचे फोटो काढणे अपरिहार्य होते. मुलाचा फोटो दाखवण्याची पद्धत मात्र रूढ झाली नव्हती, तो वरपक्षाचा घोर अपमान मानला जाई. मग त्या भावी वधूस कोणा काकी मामीचे अल्टर करून लहान केलेले पोलके घालून आणि आईचे पातळ नेसवून फोटो काढायला नेले जाई. चेहेऱ्यावर पांढरीफट्ट पावडर, डोळ्यात काजळ, गळ्यात आईची एखादी चेन/मोत्याची माळ आणि केसात समोरून दिसावे असे माळलेले गुलाबाचे फूल असा जामानिमा असे. मग त्या मुलीचे विक्रमकाकांनी अतिसुंदर सदरात मोडणारे, पाहता क्षणी वर पक्षातील साऱ्यांनी 'पसंत आहे मुलगी, फक्त नारळ आणि मुलगी द्या बरे!' असे  म्हणावे असे फोटो काढावेत हीच समस्त माय-बापांची इच्छा असे. सगळे फोटो काढताना विक्रमकाका ‘स्माईल प्लिज’ म्हणायचे. मग तिचे उभे, समोर पाहून, तिरपा भोळा कटाक्ष टाकून असे मेनका/अप्सरा रुपातील विविध फोटो काढत. या फोटोनीच तिला लग्नाला उभे केले आहे याची दवंडी पिटली जायची.🙂 त्याकाळी पुत्ररत्नांना वधारलेला भाव असल्याने त्यांचे फोटो कोणी मागत नसे. आता मात्र उलट परिस्थिती आहे, वरपक्षाचा भाव  शेयर मार्केट सारखा ढासळला आहे, तर वधूला सोन्याचा भाव आला आहे. सोन्याला मागणी नसली तरीही रोज भाव चढतातच. आता मुलाचा फोटो पाहिल्याशिवाय कुठलीही मुलगी लग्नाची पहिली फेरी मुळीच सुरु करत नाही. काळाचा महिमा!!!😅


A large variety of photographic techniques and media are used in the process of capturing images for photography. These include the camera; stereoscopy; dualphotography; full-spectrum, ultraviolet and infrared media; light field photography
All time favourite picture!! :)

माणसांचे फोटो काढताना इतकी सत्वपरिक्षा असते की तासन तास दबा धरुन पक्षी-प्राण्यांचे फोटो काढणारे हौशी फोटोग्राफर पाहून त्यांच्या तप:श्चर्येस साष्टांग दंडवत घालावा लागेल.🐅 हळूहळू फोटोंची गाडी कृष्णधवल वरून कलर फोटो आणि आता तर high definition वर आली. पावडर फासून, काजळ माखून फोटो काढणं बंदच झालं. आता अगदी साग्रसंगीत मेकअप केला जातो, वर तो नॅचरल दिसण्यासाठी सारे जिवाचा आटापिटा करतात.  नववधूच काय करवल्या वधू-वराची माय इतका बेमालूम मेकअप करतात की समोरुन आलेल्या सख्ख्या बायकोला तिचाच नवरा पटकन ओळखू शकत नाही. मनुष्य प्राण्यास स्वत:ची ओळख विसरायला लावणाऱ्या समग्र मुखकमल-रंगोटी  कलाकारांचे करावं तेवढं कौतुक कमीच.💄 आता पुरुषही यात मागे पडलेले नाहीत, बराच मेकअप करतात, लिपस्टिक तेवढी लावत नसावेत. (असे आपले मला वाटते.. तज्ञांनी खुलासा करावा). लग्नात तर बिचाऱ्या कातावलेल्या नववधूला शेकडो  पोझेस आणि लाखो अँगलने प्रेमविव्हल कटाक्ष टाकायला लावून फोटोग्राफर अगदी जेरीस आणतात.👰 बोटांचे पिंपळपानं करून पतीकडे पहा, तिरकस बघा, मेहंदीकडे दोघेही    पहा, ढगात पहा या सगळ्या पोझेस खूप ठरवून केलेल्या वाटत असल्यामुळे कॅन्डीड फोटोंचंही विचित्र प्रस्थ आलं. त्यात कोण पाठमोरे गप्पा मारतंय, तर  कोण खिदळत उभे, कुणाचा आ वासलेला तर कुणाचा मोठा तोबरा भरलेला असतो. असे अनेक मनोरंजक  फोटो येतात. या candid फोटोना 'कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही' असे फोटो म्हणावे. अहो यात वधू-वर देखील भलतीकडेच पहात असतात. पूर्वी मोजके आणि कृष्ण धवल फोटो, ते ही मोजून  महत्वाच्या विधींचे, लोकांचेच निघत. फोटोग्राफरला सक्त सूचना असे. फोटो दहाच काढा, वीस च हवेत.. वगैरे. अनेकदा भटजीबुवा, इतर बघे लोक यांचे अर्धफोटो निघत! लग्नाच्या फोटोचा अल्बम मिळे मिळे पर्यंत डोहाळे जेवण, बारसे असे फोटो काढ़ायची वेळ येऊन ठेपे!🤣 फोटोग्राफर रोल भरल्या शिवाय फोटो छापत नसत. मधे इतका काळ गेल्यामुळे छाटणी झालेली अपमानित मंडळी अर्ध्या-मुर्ध्या फोटोंचा जाब विचारणे सपशेल विसरून जात. मोठ्ठ्या वादावर काळ फोटोग्राफरचा सुंदर काळा पडदा टाके. आजच्या काळात सारीच वऱ्हाडी मंडळी सुंदर मेकअप करून भूलोकीच्या गंधर्वा सारखे दिसतात. मेकअप आर्टिस्ट नावाच्या कलाकार रूपी देवाच्या करामतीमुळे सगळं जग कसं देखणं, अतीसुंदर वाटायला लागतं. हे लोक बाहेर असे का दिसत नाहीत, आजच इतके स्मार्ट /बरे कसे काय  दिसतात बुवा??🤔 अशा फुटकळ विचारांना आवर घालून आपणही त्या ‘प्रेक्षणीय’ लग्नाचा आनंद घेऊ लागतो. दगडात देव शोधणारी आपली नजर सुंदर होते मग अवघे जग सुंदर दिसू लागते. हल्ली फोटोंचा सुकाळ असल्याने लग्नाचे लाखो फोटो निघतात, ते ज्याचे त्याने पहाणे जास्त शहाणपणाचे, हे फोटोग्राफर बरोब्बर ओळखून असतो. यास्तव ते यक्ष-गंधर्व-अप्सरा रुपातले दैवी महाअल्बम वर्षभराने मिळतात. तेंव्हा नवरा-नवरी सोडून इतर कोणाला त्यात काही इंटरेस्ट उरलेला नसतो. 


पूर्वी फोटोग्राफीमध्ये फार टेक्नॉलॉजी नव्हती, त्यामुळे ते काळे-पांढरे फोटो तुमच्या चेहेऱ्यावरचे उग्र, करारी किंवा मोहक भाव अचूक दर्शवत. ओटीभरण्याचे फोटो काढणे ही प्रथा त्या काळी सुरु झाली. आधी फक्त त्या मुलीचे सीता, लक्ष्मी असे विविध देवी रुपातले फोटो असत. नंतर मात्र त्यात केस सोडून, फुलांची परडी किंवा फुलाचे धनुष्यबाण घेऊन, चंद्रावर बसून अशा नाना तऱ्हा सुरु झाल्या. आता तर पतिदेवांवर मदनबाण रोखलेल्या दुर्गा रुपातील गर्भीणी ललना पतीदेवाना पळता भुई थोडी करायला लावताना दिसू लागल्या आहेत!  मोबाईलमुळे प्रत्येक क्षणाचा फोटो काढून तो सगळ्यांना क्षणार्धात पाठवणं अगदी सोपं झालं आहे.🤳 या पिढीचा दृष्टिकोन ‘if it is not on Instagram/Facebook, did it even happen?’ असा आहे, त्यामुळे सगळे धावते समालोचन ऑनलाईन टाकतात. लोकही सोसेल तितका सोशल मीडिया पहातात, मज्जा घेतात.👩‍💻


A large variety of photographic techniques and media are used in the process of capturing images for photography. These include the camera; stereoscopy; dualphotography; full-spectrum, ultraviolet and infrared media; light field photography.
My super imressive photography skills!! :P 

पन्नास वर्षांपूर्वी लहान मुलांचे फोटो काढणे हे एक दिव्य होते. आताची पिढी मात्र अगदी स्मार्ट आहे. इवली इवलीशी बाळं छान पोझ देऊन फोटो काढून घेतात ते फोटो पाहून चकित व्हायला होतं. कुठे ही फोटोजेनिक पिढी आणि कुठे फोटोग्राफरच्या नाकी नऊ आणणारी ती आमच्या काळातली गुलाबाची फुलं?😅 सगळ्यांना सौंदर्याचा जन्मापासून अभिमान आणि कौतुक आहे आणि त्यांच्या आई-बाबांना पण तेवढेच कौतुक आहे. आता एक या दो मुळे कौतुक वाढले, आमच्या काळी डझनावारी मुलांचे कोण कौतुक करतो? त्या काळी एखादा संक्रातीचा, घोड्यावरच्या शहाण्याचा बालपणीचा फोटो ही एक चैन होती. त्यानंतर दहावीत एखादा ‘आयडेंटी’फोटो निघे. या नंतर डायरेक्ट मुलींचे ‘दाखवायला’ काढलेले फोटो आणि मग लग्नाचा अल्बम इतका सोपा मामला होता. त्याहून जास्त फोटो म्हणजे अगदी श्रीमंती चोचल्याचे लक्षण मानले जाई. बाकीच्या सामान्य पालकांना आपले बालक फोटो काढायच्या लायकीचे आहे असं कधीही वाटत नसे. आमच्या बालरूपाचे कुठलेच पुरावे ठेवावेत असे पालकांना वाटले नसावे.🤔 त्या घरंदाज पालकांना मुलांचे फोटो असे फेसबुकवर टाकणे मुळीच खपले नसते, 'घरची धुणी का धुवायची रस्त्यावर???' असा  खणखणीत सवाल  नक्कीच केला असता.🤣


        बाकी आताच्या बालकांचे फोटो पाहून 'रम्य ते बालपण' असे वाटते आणि आम्ही कधी अशी रम्य गोजिरवाणी मुले होतो का??? असा एक प्रश्नच पडतो. आमची पिढी ‘रोल किती उरला आहे’ याचा हिशोब करत मुलांचे कौतुक करत आली. फोटो मर्यादित असल्याने त्यांनाही कौतुक खूप असायचं.😊 मुलांचे बालपण अगदी सुंदरपणे जपत आणि फोटोचे छान अल्बम करून, तारखा आणि थोडी फार माहिती लिहून ठेवलेले अल्बम बघायला आज खूप मजा येते. आम्ही कधी सुंदर बालके होतो की नाही असे प्रश्न अनुत्तरीत असले तरी गोंडस मुलांचं बालपण आमच्या भूतकाळाची सफर घडवून आणतंच. आजही मला ते लॅपटॉप वरचे फोटो समाधान देत नाहीत… अल्बमची मजा त्यात नाही.🖼


आजची एकविसाव्या शतकातली स्मार्ट बाळे जन्म घेताच लगेच  छान पोझ देतात. सेल्फी, पाउटी अशा नवीन नवीन ट्रेंड्स रोज बघायला मिळतात. आमच्या पालकांनी ही आचरट पाऊटी बघून नक्कीच आमचे दात पाऊटी सकट घशात घालायला कमी केले नसते… आज प्रत्येकालाच सुंदर दिसायचंय.. सारेजण खांदे ताठ करुन, पोट आत खेचून, श्वास रोखून आणि हे सारं करताना चेहेऱ्यावर सुंदर नैसर्गिक हास्य ठेवण्याचे दिव्य करुन सुडौल फोटो काढण्यात व्यस्त असतात. घरी मुलांना कपडे, फॅशन, केशभूषा या साऱ्यावरून ओरडत असलेले पालक सोशल मीडियावर त्याच फोटोला पहिला ‘लाईक’ देऊन अंगठा दाखवतात !👍

Commercial photography is probably best defined as any photography for which the photographer is paid for images rather than works of art. In this light, money could be paid for the subject of the photograph or the photograph itself.
Thank you Mr. Mhatugade for sharing pictures of this pretty girl!!

प्रत्येक मोबाईलधारक स्वतःला जागतिक किर्तीचा फोटोग्राफर समजतो. माणूस स्वतःइतकं प्रेम कुणावरच करत नाही आणि यातूनच सेल्फीश सेल्फीचा जन्म झाला असावा. या सेल्फीश वेडापायी जीव घालवून बसणारे महाभागही आहेत. आता सेल्फीस्टिकमुळे वेडेपणा वाढतच चालला आहे. रस्त्यावर मोबाईलकडे बघत वेड्यासारखी तोंडे करत, स्वत:लाच चोच काढून वेडावत  उभ्या असलेल्या सर्व आबाल-वृद्धाना पाहून मस्त मनोरंजन होते.🤣 असा हा कृष्णधवल पासून रंग उधळणारऱ्या रंगीत सेल्फी पर्यंत रंजक प्रवास सुरूच आहे. आमची पिढी या सगळ्या प्रवासाची साक्षीदार आहे. आजही आम्हाला सेल्फी घेताना कुठे पहावं कळत नाही… सगळ्या सेल्फीत आपण मंगळावरचे/परग्रही लोक वाटतो. कधी डोके मोठे, कधी कपाळ सुजलेले तर कधी गाल फुगलले! अश्शी आपलीच एका हून एक विद्रूप  प्रारुपे पाहून हसावे की रडावे समजत नाही. सेल्फी पाहून  मुलगा-मुलगी पसंती करायची वेळ मात्र येऊ नये हो.😅


         या सेल्फीतून हे शिकावे की, आपण स्वत:ला जसे दिसतो तसे लोकांनाच काय निर्जीव कॅमेऱ्याला सुद्धा दिसत नाही. सबब सुंदर दिसण्यापेक्षा  सुंदर असणे महत्वाचे. उद्या तंत्रज्ञान यापुढे जाऊन सेल्फीत मनातले क्षूद्र विचार दाखवून दटावू लागले… 'ताई शेजारच्या बाईच्या साडी वर जळू नका...काका तुमच्याच बायकोकडे बघा, तिकडे  कश्शाला लक्ष?? दादा सुटलेली ढेरी दिसणारच कीsss'...🤣 तर आधी लोक हे सेल्फीचे बटन डिलीट करून टाकतील! आपले मन आणि विचार शुध्द निर्मळ असले की मग असा मनाचा  सेल्फी भारी येणारच की!!!❤

स्माइल प्लीज म्हणा आणि  प्रयत्न तर  करा..🙂


विजयश्री तारे जोशी

तारीख 11.10.2020


टिप्पण्या

  1. प्रत्युत्तरे
    1. मस्त. माझ्या लग्नात मोजून २४ फोटो b/w. मुलाच्या लग्नात १८०० रंगीत पाठवले तुम्ही सिलेक्ट करा म्हणून फोटोग्राफरने. मी ते प्रकरण मुलाचया गळ्यात टाकुन मोकळा झालो.

      हटवा
  2. छान मनोरंजक आठवणी. खरच फोटो स्क्रीन वर बघायला मजा येत नाही. अल्बमच खरे समाधान देतात..

    उत्तर द्याहटवा
  3. ✌✌👌✌✌
    Madamji June photo sapadale Kaya ...tyatin ek Chan ani Sunder likhan tayar zala.trivar vandan tumache skills na ani command bhashet varacha .Kayi photo pahayala milaletar. Bare vatale .amhi fakt ekacha baju bagat hoto Dusri bhakkam baju pan bagayala milala asecha Prem phulo kayamche .
    Ajoon pushkal lihinar ahe .Maja ek likhan hoyil bus karato . Sunder Chan asecha Raha .tumache better half make namaskar sanga. Bus atta jasta not karatnahi .Thank u
    R.B.Tophkhane

    उत्तर द्याहटवा
  4. कसे ब्बाई सुचतात विषय...भारी लेख आणि जोदीचा फोटो
    मधुरा

    उत्तर द्याहटवा
  5. विजयश्री !"स्माईल प्लिज"मधले स्माईल तू आम्हा वाचकाना अगदी हातचे काही सुद्धा न राखता लेख रूपानं वाटतीस आणि हसवून आमची मने हलकी करतीस !हे तुझे सर्व लेख तुला "विनोदी लेखिका"म्हणून शिक्का मोर्तब करणार अस दिसतय !कारण प्रत्येक लेखातील तुझी मध्ये मध्ये खुसखुशीत विनोद पेरण्याची शैली फारच बहारदार वाटते .तुझ्या अगी असणाऱ्या विनोदी स्वभावामुळे तुला जीवनातल्या अनेक प्रसंगात विनोदी बाजू बरोबर दिसते.मग ते शालेय जीवन असो,मंगळागौरीसारखे पारंपरिक सण असोत तुझे ट्रेनिंग घेण्याचा अनुभव आणि आता हा फोटोंचा अनुभव ,या प्रत्येक प्रसंगाचे तो प्रसंग जसाच्या तसा उभा करणे अगदी त्या विशिष्ट काळासकट आणि हे कौशल्य करतानाच त्यात विनोदी प्रसंग बेमालूमपणे मिसळून वाचकाना खिळवून ठेवणे ही कला तुला छानच जमलीय .या लेखात सुद्धा लहान मुलांच्या फोटोचे प्रसंग ,हानीमुनच्या वेळचा प्रसंग(तिथे सुद्धा तुझी विनोदी बुद्धी पूर्ण जागरूकतेने काम करत होती😃)नवराबायको चे जोडीने फोटो काढताना तर तुझ्या विनोदी स्वभावाला जणुं पंखच फुटले आहेत
    असा हा तुझा लेख पूर्वीपासून आत्तापर्यंतच्या काळापर्यंत फोटोग्राफीत झालेल्या बदलाचा आढावा एखाद्या तज्ञ माणसाप्रमाणे घेतानाच तो कंटाळवाणा होऊ नये म्हणून विनोदी अंगाचीही छान सजावट करतो त्यामुळे रटाळपणाचा आरोप कुठेही करूशकत नाही हेच त्याचे यश म्हणावे लागेल .🙏🏻👌🏻🌹
    मनिषा कुलकर्णी.दूबई

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. Thank you so much Manisha!!
      Such a beautifully written and thoughtful comment.
      Really glad to have a friend who remembers everything about my blog and has been encouraging me always.

      हटवा
  6. श्री, नेहमीप्रमाणे च नितांत सुंदर लेख!!! कुठून आठवतात ग तुला एव्हढे सगळे विषय? बाकी लेख वाचताना प्रत्येक वेळी जाणवत, किती आपल्या सारखच वाटत न हिला? कस आपल्या मनातलं बोलते ही!आणि इथंच तू खर आम्हाला जिंकतेस!!! विजयश्री!!!
    अशीच लिहीत राहा!👍

    उत्तर द्याहटवा
  7. वाह. नितांतसुंदर लेखन. सर्वसाधारणपणे आमच्या आतापर्यंतच्या फोटो विश्वात जशा घटना घडत गेल्या त्याचाच आलेख डोळ्यासमोर उभा केलात की तुम्ही! मला वाटतं होतं की एकदा माझ्याकडून रोल व्यवस्थित न अडकविता गेल्यानं रोल न फिरता नुसतंच क्लिक्स होत गेल्याने पूर्ण रोल वाया गेला होता. अशीच घटना तुमच्याकडून पण वाचायला मिळते का काय?. पण काही म्हणा, रोलच्या फोटो ग्राफीची सर डिजिटलला का कोण जाणे, येत नाही.
    परत एकदा चांगल्या लेखाबद्दल अभिनंदन. Keep it up.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. Hahahaha.. I have always been first one to accept 'mala kahi yet nai' in camera matters. My kids laugh at me for this but when someone makes technical mistakes I get to give them a great lecture so it's worth it.. 😁😁😁


      Thank you so much Mr.Joshi!!

      हटवा
  8. 😃😃 जया किती सुंदर लिहिले आहेस. विक्रम फोटो स्टुडिओच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. त्यावेळी फोटो काढणे हे केवढं अप्रुप होतं ना ? काळ बदलला आणि त्यातली गंमत कमी झाली. पण तू सगळं चित्र जसच्या तसं उभं केलंस. तुमच्या दोघांचा फोटो ही छान !!👌👌👏👏👏
    निलिमा परांजपे डोंगरे

    उत्तर द्याहटवा
  9. खूपच सुंदर लेख..पूर्वीच्या काळातील फोटोग्राफी ते आताची फोटोग्राफी यात झालेला प्रचंड बदल अचूकपणे टिपला आहे..विक्रम फोटो स्टुडिओचे यथार्थ वर्णन केले आहे..मलकापूर मधे आम्ही असताना आमचे सर्व फोटो विक्रम काकानींच काढले आहेत..NCC च्या ड्रेस मधे फोटो काढायची त्या वेळी क्रेझ होती..माझाही फोटो आहे..!!😎असो..
    संपूर्ण लेख वाचनीय आहे.. भाषाशैली अतिशय उत्तम..👌👍
    : मनोज बोरगावे..

    उत्तर द्याहटवा
  10. jgd. "स्माईल प्लिज"चा हा हास्य रंजक प्रवास चपल चरण हरिणीच्या वेगवान मोहक दौडी सारखा आहे. विक्रम काकांच्या छाया चित्रणातील पराक्रमी उपक्रमाचे खुमासदार किस्से अस्सल मलकापुरी !कोकर उड्या घेतच तुझे शब्द खेळकर बनतात ,झर्‍याचा खळखळाट अवखळ तशी लेखन शैली हासत खिदळत रान भरार्‍या घेणारी. बाळांच्या फोटो सेसनसाठी सजवलेल्या बाळांना घेवून येणार्‍या बाया बापड्या माऊलींच्या धडपडी व स्डुडिओत अंधाराने घाबरलेल्या बाळांचे आक्रोश यांचे साग्रसंगीत वर्णन हे तर चपलख शब्दचित्रच वाटते. तुझ्या मनाच्या कॅमेर्‍याने टिपलेली चित्रे बोलकी होतात. फोटो नीट येण्यासाठी फोटो ग्राफरला कराव्या वागणार्‍या खटपटी लटपटी जिवंत वाटतात.मूलांच्या आकांताने फोटोग्राफरचे प्रयासावर पडलेली पाणी व माऊलींची घोर निराशा !अयडेंटिटी कार्डचा मजेशीर शालेय अनुभव गमतीशीरच!मधुचंद्राचे फोटोग्राफिचा अद्भुतरम्य थरार व रोल धुलाईच्यावेळची अनाम जोडप्याची सनसनाटी घटना,सारे रम्य व रौद्र रसांचे अजब मिश्रण! फोटोग्राफीचे जोडलेले नमुने उठाव देतात निवेदनाला!कृष्ण धवल ते रंगीबेरंगी छायाचित्रणाचा रंजक प्रवास मोबाईल फोटोग्राफी पर्यंत येताच स्वकेंद्री सेल्फिश सेल्फिचे अवतरलेले फॅड!त्या सेल्फिचे जीवघेणे प्रेम कधी धोक्याची घंटा वाजवते. नार्सिसचे वारसदार भेटतात ते सेल्फिच्या रानावनात,देवासमोर सेल्फी काढणारे वीर जणू देवालाही दर्शन प्रमाणपत्र सादर करु पाहतात. स्वतः घेतलेला फोटोग्राफीचा अनुभव ! याही क्षेत्रात "आगे है हम।" सांगणारा! आठवणींंची मृगया करायला हे फोटो व आतील स्मृतिचित्रे रम्य भूतकाळात नेणारी! प्रिवेडिंग व पोस्ट वेडिंग फोटो सेसनच्या कैफात खरे प्रेम पारखे तर होत नाही ना? यासाठी केलेले न खरे वास्तवाला घटस्फोट देणार नाहीत का? सिनेमा दोन तीन तासात संपतो पण सिनेमासारखे आभासी जीवन दीर्घ जीवनप्रवासाला रंगत देईल का?शेवटी वास्तव व मनातली अनुभवचित्रेच जीवनाला आकार देतात. ही छायाचित्रांची(ती शेवटी शरीररुप छायेची) चित्रमय आभासी प्रतिसृष्टी वीजेप्रमाणे क्षणक्षणा बदलणारी असल्याने तिच्यात जीवनाचा चेतन आत्मा हरवलेला असतो,फोटो निघेपर्यंत जीवनप्रवाह पुढे सरकलेला असतो ,त्यात तो फोटो बदलेला असतो ,नवजीवन समोर येत असते, ते नित्य नूतन जीवनच सत्य असते. तरी भूतकालात डोकावणार्‍या मनाला गतप्रतिमेत विरंगुळा मिळतो,हे ही नसे थोडके? चपळ गतीने चकित करणार्‍या शैलीने हा लेखही ललितरम्य झाला आहे, हे तर सृजनशील मनाचे हुंकार!🌹🌹🌹

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. शेटे सर,खूप खूप धन्यवाद..आपली प्रतिक्रिया खरी बोलकी असते.
      देवा समोर सेल्फी काढून आपण काय मिळवतो😁😁😁काही समजत नाही..पण देवळासमोर होते असे. अंतर्मनातला देव दिसला तर या प्रतिकांची गरज उरणार नाही. लहानपणीच्या आठ्वणी अजून सुरुच आहेत. त्यामुळे मी मोठी होत नाही आहे. पण मला हे सारं आठवले की सांगावे असे वाटत आहे.

      तुम्ही प्रोत्साहन देऊन हे बालपण सुख परत अनुभवायला देता.🙏🏻🙏🏻🙏🏻

      हटवा
  11. तारे मॅडम नमस्कार, आपला smile please, लेख वाचला आणि इतके दिवस स्मृती मध्ये पडून राहिलेला एक कप्पा उघडला आणि वारुळतून मुंग्या बाहेर पडावेत तसे एक एक प्रसंग अठवयला लागले.
    आमच्या लहानपणी आमचे गावी एक दोन फोटोग्राफर होते. स्टुडिओ नव्हता. एकादे दिवसी खांद्यावर tripod आणि हातात मोठी पेटी घेऊन गल्लीतून फोटोग्राफर निघाले तर आम्ही लहान मुले त्यांच्या पाठोपाठ पळत आज कुणाकडे फोटो काढणार आहेत म्हणून जात असू.(जसे अस्वल घेऊन दरवेशी आला, किव्हा माकडे घेऊन मदारी आला तर मुले त्यांच्या मागे पळत तस्से ) ज्या घरी फोटो काढणार तेथे मग जागेची पाहणी करून अंगणात एक मोठी सतरंजी अंथरली जायची, पूर्वेकडे तोंड करून फोटो काढले जात. मग इकडून तिकडून खुर्च्या गोळा करून माडले जात, त्यानंतर धोतर,कोट, टोपी, फेटा रेशमी रुमाल,उपरणे,अश्या वेषात पुरुष, व ठेवणीतील साड्या,मोठे कुंकू ,खूप दागिने घालून महिला मंडळी बाहेर येत मग कोन कोठे बसणार याची रंगीत तालीम घेऊन मंडळी आसनस्थ होत. आपल्या दोन्ही हाताची दहा बोटे,नीट दिसतील असे हात मांडीवर ठेवत. मग फोटोग्राफरचे सूचनेनुसार डोके, चेहरा, मान डोळे, टोपी उपरणे पदर ई. ची नीट माडणी केली जाई. त्यानंतर लहान मुले पुढे सतरंजीवर बसवली जात. त्यांचे एक एक नमुने, अवतार, चेहरे, बघूनच आम्हाला हसू आवरत नसे. मग फोटोग्राफर आम्हाला दटाऊन लांब जायला सांगे.. मग एकदाचा फोटोचा कार्यक्रम पूर्ण होत असे.

    पुढे १९६०चे दरम्यान छोटा बॉक्स सारखा 📷 कॅमेरा व बसी सारख्या भागात, लिंबा इतका बल्ब लावलेला फ्लॅश लाईट टाकणारा कॅमेरा वापरला जाऊ लागला. अश्या फोटोग्राफरच्या मोहिमा पाहून आपणही फोटोग्राफर व्हयाचे हे खुळ डोक्यात शिरले. व काही केल्या ते निघेना.तशातच गावात एकाचा जुना कोड्यक बॉक्स कॅमेरा ₹३० ला विकणार आहे असे कळाले मग काय... आईचा लाडका म्हणून कसे बसे ₹१० मिळाले. वडिलांनी ऐकून सुध्दा घेतले नाही. पण एक तोडगा सुचवला, शेतातील सर्व कापूस सुट्टी दिवसी वेचायला आलास तर देऊ. मग काय? कापूस वेचणी मान्य केली आणि उरलेले पैसे मिळवले माझे उंन्हातले कष्ट पाहून जादा १०₹ रोल साठी पण दिले
    अगदी आनंदात कॅमेरा घेऊन घरी आलो, गल्लीतील सर्व मुलांना दाखवला, सायकल काढली,अद्याप सीटवर बसून सायकल चालवता येत नव्हती, मध्ये आडवे पाय टाकून सांगली गाठली. तेव्हा हरभत रोडवर जप्ती वाले यांचा sun art photo स्टुडिओ होता. तेथे कॅमेरा दाखवला,रोल भरून घेतला, फोटो काढण्याचे तंत्र समजून घेतले घरी आलो.
    आता फोटो काढण्याची मोहीम सुट्टी दिवसी सुरू झाली. गळ्यात कॅमेरा अडकून नदी किनारा, गावाबाहेरील देवळे, दर्ग्या जवळचा महाकाय चिंचेचा वृक्ष, जवळच्या मित्रांचे ग्रूप, अगदी नदीतून बाहेर पडणारे म्हसिंचे कळप इ. माझ्या कॅमेऱ्यात कैद होऊ लागले. असेच एका संध्याकाळी सुरेख उन पडले होते, गावाजवळील एका शेतात सुंदर खिलारी बैलजोडी ने मशागत चालू होती फोटो घेण्याचा मोह आवरला नाही, सूर्य प्रकाश,अंतर, टायमिंग, छान जमले होते. फोटो काढला. रोल संपला की पुन्हा सांगली ,जुना रोल प्रिंटिंग ला टाकून नवा भरून आणायचा, स्टुडिओच्या काकांची चांगली ओळख झाली. बैलजोडीचा फोटो इतका अप्रतिम आला होता की काकांनी खूप कौतुक केले.त्या शेतकऱ्याने तर तो फोटो मोठा करून भिंतीवर लावला,वर मला खुशीने ₹५ दिले. पण वेड फार काळ परवडणारे न्हवते तरी थोडे तरी सुरू असायचे, पुढे हायस्कूल शिकन्यासाठी सांगलीला गेलो, काही दिवसांनी खोलीतून कॅमेरा चोरीला गेला आणि ही मोहीम संपली.
    पुढे फलटण ला माझे मित्र, किशोर दळवी उत्तम फोटोग्राफर होते, त्यांचा स्टुडिओ होता (१९७३) त्यांचेकडे गेलो तर डार्करूम मधे त्यांचे काम असे, फिल्मवर लाईट टाकताना हातांच्या बोटाची चपळाईने हालचाली करून लाईट कंट्रोल करून उत्तम प्रिंट काढणारे ते प्रसिद्ध फोटोग्राफर होते.
    मलकापूर येथे विक्रम फोटो स्टुडिओचा अनुभवही तर खूप छांन. माझ्या लहान मुलाचे अनेक सुंदर फोटो विक्रम मध्ये काढले आहेत. भाडी दुकानदार रमाकांत बारटक्के व विक्रमचे अकाराम हे त्यांचे स्वभाव गुणामुळे अद्याप स्मरणात आहेत. आपल्या लिखाणाबद्दल काय लिहावे,एकदम अप्रतिमच,सर्व प्रसंगाचे वर्णन हुबेहुब शब्दबध्द करण्याची ताकत त्यात दिसून येते.ब्लॉग वाचायला आनंद वाटतो. सर्व फोटो पण सुंदर आहेत.
    शेवटी, माझ्या या लिखाणाला अभिप्राय म्हणता येणार नाही पण, आपल्या लेखाने माझी ६० वर्षापूर्वीची आठवण जागी झाली आणि इतके सर्व नव्या तंत्राने लिहिण्याची प्रेरणा दिली यातच आपल्या लेखनाचे सामर्थ्य लपले आहे. लिहित रहा.
    प्रा.सुभाष बेले. १४ ऑक्टोबर २०२० .

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. बेले सर..खूप खूप धन्यवाद.तुमचे फोटोजेनिक प्रयोग ऐकून मस्त वाटले.तुम्ही असे उद्योग केलेत हे खरे वाटत नाही.तरी तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकले असता यात काही शंका नाही😁अजून प्रयोग करा...आता काय रोल वाया जात नाही. नाही आवडला केला डिलीट.तुम्ही इतके छान प्रोत्साहन दिले आहे की परत परत मी बालपणात शिरते आणि असले खट्याळ उद्योग लिहिते.मला लेखन चुकाही सांगा बरं.

      तुम्ही सायन्स शिकवत होता असे लोकांना पटत नाही इतकं सुंदर लिहिता तुम्ही. वाचतच रहावे असे वाटते. तुमचे हात असेच माझ्या शिरावर राहोत...काही चांगले होईल🙏🏻🙏🏻🙏🏻

      हटवा
  12. Apratim madam,tyakali tumhi varnan kele tasech khedegavat photographar hote,ekane photo kadhla ki dusryachi bayko mhanaychi aplapan photo kadhuya itki odh asaychi,tumhi mhanala polke ghalyche tasech dress hote,Madam tumhi achuk varnan kele ahe ,madam tumhala he suchne mhanje amchya buddhila chalna dile sarkhech ahe.Salute tumchya buddhimatela ,asech lekh prakashit karat raha,Best of luck madam

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. Thank you so much Mr. Sangrulkar!

      I am appreciating the fact that you always read all my blogs thoroughly and give me your thoughtful reviews. Thanks a lot for that.

      हटवा
  13. जयश्री,नेहमीप्रमाणे हा लेख सुद्धा फार छान झाला आहे, विक्रम फोटो स्टुडिओ च्या आठवणी मलकापूर येथे घरोघरी आहेत, तू त्या पेक्षाही पुढे जावून विशेषतः लहान बाळांचे फोटो काढताना आकरा म ची कशी धावपळ व्हायची ते छान लिहिले आहेस. आता सेल्फिचा जमाना आला आहे. परंतु पूर्वीचे ब्लॅक व्हाइट फोटो अतिशय चांगले वाटतात, कोल्हापूर येथे सुचित्रा फोटो स्टुडिओ मधील फोटो (ब्लॅक व्हाइट) अप्रतिम असायचे. फोटो काढायला कुणाला आवडत नाही. तू अतिशय चांगला विषय निवडला आहेस, यात झालेले विनोद चांगल्या प्रकारे मांडलेस. छान, अशीच लिहित रहा. एकदिवस तू लिहिलेला कथा संग्रह, कादंबरी वाचायची आहे, लवकरच योग यावा अशी अपेक्षा.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. Thank you so much Doctor.

      Don't know about katha sangrah or kadambari but I am loving writing on blog and getting all these first hand reviews. So definitely will be writing more!

      हटवा
  14. Very nice article madam...I like your style very much.
    Thanks for good memories


    Milind Kulkarni

    उत्तर द्याहटवा
  15. विषय निवडीमध्ये तुझा हात कोणी नाही धरू शकणार. हटके विषय घेऊन त्याला विनोदाची झालर देण्याची हातोटी वाखाणण्याजोगी. Smile please ची वेगवेगळी रूपे स्वतःचीच असल्यासारखी वाटतात. पूर्वीचे हनिमून चे स्वतःच्या कॅमेऱ्यात काढलेल्या फोटोंचे वर्णन खुदकन हसायला लावते.संक्रांतीचे फोटो काढण्याचा अट्टाहास भारी जमलाय.जोडीचा typical style मधला फोटो 🤪🤪 तू रंगवलेला ब्लॅक अँड व्हाईट ते colour ते सेल्फी चा फोटो प्रवास सर्वांच्या आयुष्यात तसाच झाला आहे म्हणून तो खरा वाटतो.मस्त रंगवला आहेस एकंदरीत smile please चा manoranjak इतिहास 👌👌
    शैला उर्फ मृदुला चिटणीस सानपाडा

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. Thank you so much Shaila Mavashi.

      Your comments have always been inspiring me to write more.

      Ya vishayachya nivadit Instagram ani Facebook cha hi motha haat ahe.. Dar don diwasani lok 50 selfies taktat aajkal.. 😁😁

      हटवा
  16. नेहमीसारखांच मस्त ब्लाॅग. फोटोग्राफरचं महत्व हल्ली फक्त मोठ्या कार्यक्रमापुरतंच राहीलय. मोबाईल मुळं सगळीच फोटोग्राफर झालीत व खरे कलाकार बाजुला पडलेत 😔😊

    उत्तर द्याहटवा
  17. एकदम छान आहे. तुमचं ऐकणारी मराठी भाषा कालप्रवाहाप्रमाणे आज्ञाधारक असुन तुमच्या बुद्धीला समजून घेते....
    शिवाजी साठे सातारा.

    उत्तर द्याहटवा
  18. Great article...I also lost honey moon photos...so my wife also laughing ...

    Thank you..

    Kiran Barve

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

Comment box -