- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
कविता खरंतर आपण सारे लहानपणापासूनच करतो, मी ही करायचे. पण आता लिखाण सुरु केल्यापासून माझ्या कविता जरा जाणून, उमजून, त्यातील काही नियम पाळून आणि विविध विषयांवर विचारमंथन करून रचल्या जात आहेत. मी स्वतःला कवयित्री वगैरे नक्की म्हणणार नाही पण या ब्लॉगपोस्टमधे टाकलेल्या साऱ्या कविता मनापासून केलेल्या आहेत आणि त्यातून भावना अचूकपणे प्रतीत होत आहेत हे नक्की!
१-दूर राहणाऱ्या साऱ्या लाडक्या लेकी यंदा कुठल्याही सणासाठी माहेरी येऊ शकल्या नाहीत. त्यांच्याच आई-बाबांची ही कविता.
२-अष्टाक्षरी ओळकाव्य, ' मावळले चंद्र किती' या ओळीच्या भोवती बांधलेली प्रेम कविता.
३- माहेराला आणि आईला शोधणारे कन्येचे मन माहेराचा रिता देव्हारा पाहून भावविभोर होते… आणि हृदयातून माय-बापाचे आठव काव्यातून मोती होउन झरतात..
त्या रित्या देव्हाऱ्यातील देवाला शोधणाऱ्या सर्व बालकांना ही कविता समर्पित ..
४- ‘न्यू इंडिया इंशुरन्स’ मधील एका सखीच्या सेवानिवृत्तीनिमित्त लिहिलेली हा काव्यरूपी निरोप.
या रचनांवर मला तुमचा अभिप्राय, सूचना, सुधारणा नक्की कळवा.
- विजयश्री तारे-जोशी
२१-१०-२०२०
स्थान:
Kolhapur, Maharashtra, India
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या





भावना शांतपणे शब्दाबरोबर विरगुळुन तुमच्या कविता मध्ये सौंदर्य वाढवतात.छान...साठे शिवाजी .
उत्तर द्याहटवाThank you !!
हटवानिवृत्तीच्या कवितेत शय्येवरी असे हवे. सर्व कविता छान जमल्या आहेत. विशेष करून माहेरावरच्या.
उत्तर द्याहटवाYah you are right!! Thank you so much for bringing it up. Will try to correct it here for sure. :)
हटवाकाव्य लेखन, अतिशय चांगला प्रयत्न ! तू गद्य, तसेच पद्य रचना सुद्धा छान केली आहेस, तुझी काव्य प्रतिभा सुद्धा फारच चांगली आहे. काव्यातून आपल्या मनातील भावना अचूक शब्दात व्यक्त करण्यामध्ये तू आमची मने जिंकली आहेस. सर्वच कविता आवडल्या, सल ही कविता मनाला खूप भावली. तू अष्टपैलू आहेस. असच लिहित जा. अभिनंदन!
उत्तर द्याहटवाThank you Dr. Potdar for your motivating comment!
हटवासुंदर कविता...फार आवडल्या
उत्तर द्याहटवाR.S.Patil
Thank you so much!!
हटवाचांगला व यशस्वी प्रयत्न!! सुरू ठेव
उत्तर द्याहटवाThanks Vishrabdha!!
हटवाखूप खूप आवड़ल्या सगळ्या कविता
उत्तर द्याहटवाThank you!!
हटवाविजयश्री, आपल्या अतिशय खुसखुशीत ,अखंड प्रवाही लेखणीने आपल्या बालपण, किशोरवयीन ,व षोडशी अशा वयाच्या वेगवेगळ्या कालखंडातील सुरेख ,लोभसवाण्या आठवणी आणि परंपरागत सणांचेही तेवढेच उत्साहाने वर्णन करणारी ,व एवढे विस्तृत लेख लिहुनही कुठेही रटाळपणाचा स्पर्श न झालेले तुझे लेख म्हणजे उदयोन्मुख लेखिकेची अत्यंत यशस्वी वाटचालच !पण या लेखाच्या प्रांतातून तू काव्याच्या प्रांतात अलगदपणे कधी शिरलीस हे कळलेच नाही .खरं तर काव्यप्रांत वाटचालीत तसा अवघडच असे मला वाटते कारण कमी शब्दांत मोठा आशय आणि तोही उत्कट भावना व्यक्त करणारा काव्यात असावा लागतो
उत्तर द्याहटवा"ह्या ह्रदयी चे त्या ह्रदया "उतरायचे समर्थ शब्दं कवीकडे असायला हवेत आणि हे सारे तुझ्या कवितेत प्रतित झाले आहे ,
लग्न होऊन सासरी गेलेल्या लाडक्या लेकीला भेटायसाठी.आईच्या जीवाची होणारी तगमग,चंद्राला साक्ष ठेवून केलेले उत्कट प्रेम,आईच्या गावावरून गाडी जात असता आईच्या आठवाने व्याकुळ झालेले मन व शेवटी मैत्रिणीला रिटायरमेंटच्यि शुभेच्छा अशा या चार कविता व त्यामधून व्यक्त झालेल्या अतिशय उत्कट ,हळूवार भावनांचे शब्दांद्वारे तू घडवलेले दर्शन अतिशय मनस्पर्शी व विलोभनीय वाटते,तू नवकवियत्री आहेस असे वाटतच नाही इतक्या त्या कविता तुझ्या लेखांप्रमाणेच सुंदर झाल्या आहेत असेच लिहीत रहा व वाचकांना आनंदी कर याच शुभेच्छा !!👌👍👍💐💐💐
मनिषा कुलकर्णी दुबई
Thank you so much Manisha!! I was not sure, if I should put my poems publicly or not. It all started with poem on our daughters who could not come home this year because of lockdown and to my surprise, I have got huge response for it as every mother had similar feelings. Since then I got a bit confident about writing poems.
हटवाYou have observed and responded superbly on my emotions. Really beautiful comment!! Thanks again.. Keep reading and giving me your honest reviews. ( I might not respond quickly but I read comments immediately and they mean a lot to me for sure!! )
So nice madam...nothing is impossible for you..best poems
उत्तर द्याहटवाRekha Patil
Thank you so much!!
हटवाकिती सुरेख...खूपच आवडल्या..रडवलेस बघ सल कवितेने
उत्तर द्याहटवाअर्चना पाटील
I cry almost every time I read that poem. Closest to my heart and yet it hurts so much....
हटवाThank you so much Archana!!
कुंदा पाटील, बदलापूर
उत्तर द्याहटवाश्री अग तू जशी उत्तम लेखिका आहेस तशी उत्तम कवयित्री देखील आहेस 👌👌 लेखा मधून विचार कळतात तर कवितेतून भावना कळतात ( अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे ) तुझ्या लेखणीतून दोन्ही गोष्टी सहजसुंदर उतरताना दिसतात सखीच्या सेवानिवृत्त निमित्ताने लिहिलेली काव्यरूपी निरोपाची कविता त्यातून व्यक्त झालेली भावना हे खरंच अप्रतिम 👌👌तू असंच छान छान लिहीत रहा तुला पुढील लेखासाठी आणि कवितेसाठी खूप खूप " शुभेच्छा "👍
कुंदा पाटील, बदलापूर
Thank you so much Kunda!!
हटवाYour words are encouraging me to write more poems and articles. Keep reading, commenting and inspiring me as always. Thanks again.
तारे मॅडम नमस्कार, तुमचे भावपूर्ण काव्य लेखन वाचले. मुळातच अंतरंगात उसळणाऱ्या भावनांचे कल्लोळ व्यक्त करणे जिथे कठीण होऊन बसते ते शब्द रुपात कागदावर उतरवणे. खूप अवघड असते, तरी सुध्दा तम्ही सुंदरपणे आपल्या भावना नक्कीच व्यक्त केल्या आहेत.या बद्दल तुमचे अभिनंदन.
उत्तर द्याहटवाकर्तुत्वाची झेप घेऊन दूर देशी गेलेली चंद्रकोर कधी एकदा येऊन भेटते,..श्रावण भाद्रपद महिन्यात तर मन वेडे पिसे होते आणि गौरीच्या पावलवरून पैंजण वाजवत येणारी चंद्रकोर डोळ्यासमोरून तरळून जाते..तिची वाटूली पाहणाऱ्या आईच्या भावना खूप सुंदर आहेत.(छ कुली,सोनुली सारखा वाटूली शब्द खूपच गोड ..कसा सुचला तुम्हाला, आवडला मला.
दुसऱ्या कवितेत,सल म्हणा,मायेचा कढ म्हणा, उमाळा म्हणा....माहेरच्या वाटेवरून जाताना सारे सारे गत आयुष आठवले,डोळे मिटल्यावर मनात भाव तरंग उठले ...डोळे ओले होऊन गेले.
आत्ता सारे काही असले तरी माय बापाविना जीवाला निवारा, नाही म्हणूनच पुन्हा एकदा त्यांच्या पोटी जन्म घेण्याची आस लागली किती उत्कट भाव.
शेवटच्या चार ओळी...काय लिहू....उरे तुझी जपमाळ, कवाड्यातली पोथी,रिता देव्हारा,यात व्यक्त झालेला तुमच्या मनीचा सात्विक भाव,काळजाला भिडणारा ,डोळे ओले करणारा,आपल्या दिवंगत माय बापाची स्मृती जागवणारा आहे. या ओळी बराच वेळ माझ्या मनात घुटमळत राहिल्या.
(सहज मनात आले,आज काल आई बापानी मागे ठेवलेल्या संपत्तीवर डोळा ठेऊन,ते वाटून घेण्यासाठी वर्षानुवर्षे भांडण तंटे करणाऱ्या नी त्यांचे कष्ट व संस्कार, उचलून वाटचाल केली तर अनेक कुटुंबे सुखात राहतील.)
मावळले चंद्र किती, मधे, शाम आणि राधा यांचे प्रेम पवित्र, देहातीत,आणि अमर आहे ,हाच भाव उत्कट आहे.
शेवटच्या कवितेत, सेवानिवृत्त होऊन जाणाऱ्या सखीला शुभेच्छा देताना, सागितले ल्या काही कानगोष्टी, मस्त जगावे ,गोड हसावे,या जगण्यावर प्रेम करावे. हे आनंदी जीवनाचे तत्त्वज्ञान, पुष्पगुच्छ यांच्या रूपाने तिच्या हाती सोपवले आहे . छान वाटले.
काव्य लेखनाची सुरुवात तर खूप सुंदर ,मस्तच, तांत्रिक बाबीत न गुंतता आतले भाव मोकळे पणाने लिहित जा
(बेळगावच्या कवियत्री, इंदिरा संत ,भावपूर्ण काव्या साठी प्रसिद्ध होत्या.)
पुन्हा एकदा , अभिनंदन..
प्रा. सुभाष बेले. ०२ .११ .२०.२०
Madam sarv kavita chhanach lihilelya ahet,Mavalale chandra kiti tuzya mazya angnat kiti apratim varnan kelele ahe 2-Mahervaril kavita tar vachun tar kelele varnan apratim,Yave poti punnha tuzya visrave dehbhan janmojanmi dhyave deva hech maj vardan,Aaicha ur bharun yeil ashi kavita ahe madam. 3)Retierchi kavitatar pharach chhan,kon kuthle,kase bhetle runanubandh he ase bandhle,athvanche moti banane ,surekh mandni,Salam tumchya buddhila ,asech lekhika ani kavyatriche likhan hot rahavo hich shubhechha
उत्तर द्याहटवा