गो गो गोवा..

25000 !!!


My blog completed milestone of 25000 hits

        माझ्या ब्लॉगला दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादासाठी मी तुमची शतशः ऋणी आहे. १ मे ला मी पहिली ब्लॉगपोस्ट टाकली. या केवळ  ६-७ महिन्यात मला २५००० हिट्स इतका प्रतिसाद मिळाला हे माझ्यासाठी अविश्वसनीय आहे. मी काही नावाजलेली लेखिका नाही. विजनवासात आनंद वाटण्यासाठी मी माझे चार वाकुडे  शब्द लिहिते काय आणि तुम्ही त्या शब्दांना प्रचंड प्रेम देता काय....... हे सारे  मला स्वप्नवत वाटत आहे.😃 

        माझ्या लाडक्या कन्येने डायरी वाचून मला लिहायला प्रवृत्त केले. मला फक्त लेखणीनेच लिहिता येतं; मोबाईल, लॅपटॉपवर टपाटप लिहिण्याएवढी मी टेक्नोसेव्ही नाही. त्यामुळे डॉक्युमेंट टाईप करून द्यायला लावून मी तिचंच काम वाढवलं. मग मराठी की-बोर्ड मोबाईलमध्ये घेऊन एका बोटाने एडिटिंग तेवढं करायला शिकले.😅 फोटोंच्या निवडीपासून पब्लिशिंगपर्यंत सगळं तीच करते. शेवटी सुगरणीने पदार्थ कितीही चांगले केले तरी ते सुबकतेने ताटात वाढणंही महत्वाचं आहे. त्या ताटाच्या दर्शनाने, गंधाने माणूस तृप्त झाला पाहिजे म्हणून या ब्लॉगचे सौंदर्य  वाढवण्याचे श्रेय कन्येलाच आहे.🙂

        दुबई, डेन्मार्क, नेदरलँड्स, अमेरिका आणि अर्थातच आपला भारत असे कुठून कुठून दिवसभर आणि बऱ्याचदा रात्री-अपरात्री views आणि comments येतात आणि मला स्फूर्ती देऊन मन मोकळं करायला बोलावतात. चोखंदळ रसिक हेच माझे बलस्थान आहात.तुमची प्रत्येक प्रतिक्रिया मला शब्दांच्या पलीकडचा आनंद देऊन जाते. ‘हे विश्वची माझे घर’ अशी साधू-संतांची भावना मनात दाटून येते आणि साऱ्यांच्या मराठी प्रेमावर जीव ओवाळून टाकावा असं वाटतं.💗

        आजपर्यंत पोटासाठी कमावले पण आता लाख मोलाची माणसे कमावली, त्यांची मनं जिंकली... ही भावना जगण्यास मोठी उभारी देते. यापुढेही जीवनाचे असेच सार्थक व्हावे आणि शारदा देवीने माझ्याकडून अशीच उत्तम साहित्यसेवा घडवून आणावी हीच एक इच्छा! ही सारी शब्द सुमने मी शारदेच्या पदकमलावर अर्पण करते. तुमचे प्रेम अखंड  राहो अशी अपेक्षा करते. अनेक धन्यवाद!!!🎉🙏

तुमचीच , 
विजयश्री तारे-जोशी 
२४-११-२०२०

Writer blogger happy writing poet 25000 views blogging facebook instagram


 


टिप्पण्या

  1. Abhinandan madam.Tumhi lihile sarv blog he kalpanik nasun vastavatil ahet tyamule tumhi ghetlele kashta vaya gele nahit mhanun tumhala 25000 liks alet,
    Madam tumhi tumchya savdine lihit rahal tarisuddha tumhala 50,000 likes yetil,asech lihit rahave amhi pratisad detach rahin.punha Abhinandan🌹💐🌷
    Jayprkash

    उत्तर द्याहटवा
  2. विजयश्री,
    खूप खूप अभिनंदन... एवढ्या सगळ्या कामाच्या रगाड्यातून तू लिहायला लागलीस काय आणि देशी विदेशी मिळून २५ हजारांचा टप्पा ओलांडलास काय,ते ही मोजक्याच काळात...अजून खूप काही चांगल्या शब्दरचनेत,ओघवत्या भाषेत लिहीत रहा आणि मराठी मनं जिंकत रहा.
    वाचायला आणि तुझं अभिनंदन करायला आम्ही सगळे आहोतच...

    लिहिणं मात्र अखंड सुरूच हवंय हं एका छान पुस्तकासाठी....
    डॉ किरण भिंगार्डे,
    भुलशास्त्र तज्ञ

    उत्तर द्याहटवा
  3. It gives me great happiness that u could achieve this tremendous 'vachak'n their remarkable comments n appreciation. Congratulations to u n all Ur family members who supported u in making this .Let God give n bless u with good health n thoughts so that u can serve all Ur existing admirers n in future too. It's great work done by u .Three cheers to u Thank u all time .
    RBTophakhane Belagavi .

    उत्तर द्याहटवा
  4. खूप खूप अभिनंदन. तुझे लिखाण अगदी साध्या पण ओघावात्या भाषेत असते. आणि तुझे सर्व अनुभव मध्यम वर्गीय माणसांचे असल्यामुळे आम्ही त्याच्याशी सहज सहमत होतो. स्वतः जुन्या आठवणींमध्ये रमून जातो. त्यामुळे तुझे लिखाण खूप जवळचे वाटते. त्यामुळे 25000 लाईक्स एवढ्या छोट्या अवधीत मिळवले आहेस. ही संख्या आणि तुझे लिखाण उत्तरोत्तर वाढत जाओ ह्या सदिच्छा आणि खूप खूप अभिनंदन.

    उत्तर द्याहटवा
  5. जयश्री, खूप खूप अभिनंदन! अवघ्या काही महिन्यात तुझ्या ब्लॉग ला २५ हजार हून अधिक हिट्स मिळाल्या त्याही देश विदेशातून ! इतका चांगला प्रतिसाद मिळण्यासाठी तुझी ओघवती लेखन शैली आणि भाषा. असेच सातत्याने लिह, आपण एका छोट्या शहरातील मलकापूर चे रहिवासी, तेथील ५० वर्षा पूर्वीच्या आठवणी तू अगदी आहे तस्या शब्दबध्द करुन त्या साक्षात समोर उभ्या केल्यास! जयश्री , तुझे पुनश्च अभिनंदन.

    उत्तर द्याहटवा
  6. विजयश्री, तुझ्या आईला तुझ्या जन्मानंतर ही चांगली लेखिका होऊन यश,विजय मिळवेल असे ज्योतिषाने भविष्य सागितले होते का?आणि म्हणून त्यानी तुझे नाव "विजयश्री"ठेवले असावे .
    बघ ना नावाप्रमाणेच तू चाहत्यांचा २५०००हजाराचा टप्पा किती अल्पावधीतच पार केलास ते सुद्धा नोकरी ,घर संभाळून !अक्षरशः विजयश्री खेचून आणलीस लेख लिहून !तुझे निरागस लहानपण,तुझ्या खोड्या,व त्याही अतिशय प्राजलपणे कबूल करण्याचा तुझा रोखठोक स्वभाव व तू तुझ्या लहानपणी साजरे केलेले सणवार, तुझ्या शाळेचे व कॉलेजचे अनुभव हे अगदी मनाच्या तळाशी इतकी वर्षे हळूवारतेने जपून ठेवले होतेस एखादी अमूल्य ठेव ठेवावी त्याप्रमाणे आणि आता ते शब्दांचे बोट धरून एखाद्या सिद्धहस्त लेखिकेसारखे लेखाच्या रूपाने सादर केलेस आणि आम्हाला आमच्याच बालपणीच्या पुनःप्रत्ययाचा आनंद दिलास .इतके पावसाळे गेल्यानंतरही अगदी आत्ता च ते प्रसंग घडत आहेत असे प्रत्येक वाचकाला वाटणे म्हणजे तुझ्या लेखणीचीच ती किमया आहे .खरचं अशीच लिहीत रहा आणि व्यक्त होऊन स्वतः ला व वाचून वाचकांना आनंद दे हीच शुभेच्छा ,शुभकामना देते !👍🏻🙏🏻🌹🌹❤
    मनीषा कुलकर्णी दुबई

    उत्तर द्याहटवा
  7. सहजसुंदर लेखन शैली हेच तुमच्या यशाचं रहस्य आहे. अवजड शब्द वापरणे वगैरे गोष्टी टाळुन बोली भाषेत लिहिल्यामुळे वाचायला मजा येते.
    Bravo. Keep it up. 💐💐
    Shirish Kotibhaskar

    उत्तर द्याहटवा
  8. तारे मॅडम नमस्कार,
    अवघ्या सहा सात महिन्यात २५००० हून अधिक रसिकांनी आपल्या लेखनातून आनंद घेतला हे खूप कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे.
    चंदनाचा पाट, चांदीचा ताट, वाट्या, ताब्या, भांडे, पुढे सुंदर रांगोळी.. उदबट्टीचा सुवास, सुग्रनिने बनवलेला व ताटात कलात्मतेने सजवलेली अनेक सुंदर स्वादाची पक्वाने पाहून कोणता बरे रसिक त्यांचा आस्वाद न घेता राहील?...
    ज्यांनी मलकापूर नगरी, तेथील निसर्ग, संस्कृती, हापूस आंब्याची आणि फनसाच्या गराचा गोडवा असणारी मायाळू, प्रेमळ, रसिक, अशी जनता यांचा अनुभव घेतला आहे अथवा तेथे वास्तव्य करून आहेत त्या सर्वांनी आणि तुमच्या सहवासातील रसिकांनी तो स्वाद भरभरून घेतला आहे. रंग बिरंगी सुगंधी फुलं आणि पिकून दरवळणारा फळांना... मी येथे आहे हो... असे सांगावे लागत नाही रसिक त्या रंग गंधाचा ओढीने आपोआप तिकडे वळतात तसाच हा रोमांचकारी प्रतिसाद मिळाला आहे.
    या प्रतिसादाचे श्रेय तुमच्या लेखन शैलीत आहे. तुम्ही स्वतः त्या प्रकारच्या जीवन अनुभवातून गेला आहात, खूप निरीक्षणे आहेत, त्यामुळे तुमचे लेखन जिवंत, निखळ आनंद देणारे, अकृत्रिम आहे. त्यामुळे सर्वांना आपलेसे वाटते. तुमचे रसिक तुमच्या आनंद यात्रेत सहभागी होतच रहाणार आहेत आणि इतक्या लोकांना वाटलेला आनंद अनेक पटीने तुमच्याकडे परत येत रहाणार आहे. तेव्हा कोणतीही तडजोड न करता अस्सल आनंद वाटतच रहा.

    तुमच्या मुलीने तुमच्यातील सुप्त लेखीका ओळखली, तिला जागे केले, लिहिते केले आणि सुंदर सजावटी ने सादर केले अन्यथा आम्ही इतके रसिक या आनंदाला मुकलो असतो तेव्हा या वाटचालीत त्यांचे योगदान ही मोलाचे आहे त्यांचे ही आभार आणि धन्यवाद.
    प्रा. सुभाष बेले. ०१/१२/२०२०.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

Comment box -